Balasaheb Thorat : किर्तनकार भंडारेंची धमकी अन् संगमनेरमध्ये थोरातांचं ‘लाव रे तो व्हिडीओ’, काय खरं काय खोटं? सगळंच दाखवलं
किर्तनकार भंडारे यांनी बाळासाहेब थोरतांना धमकी दिल्याचा हे प्रकरण आहे. संगमनेरमध्ये थोरतांच्या नेतृत्वामध्ये त्यानंतर शांती मोर्चा काढण्यात आला आणि सभा देखील घेण्यात आली.
‘हा जो कोणी महाराज आहे त्याला मी महाराज असं म्हणणार नाही’, असं बाळासाहेब थोरतांनी म्हटलेलं आहे. किर्तनकार संग्राम महाराज भंडारे हत्यार बनून तालुक्याचं नुकसान करतोय, असंही बाळासाहेब थोरतांनी म्हटलंय. तर संगमनेरमध्ये घेतलेल्या सभेत बाळासाहेब थोरतांनी कीर्तनकार भंडारींचे थेट व्हिडीओ दाखवले. कीर्तनकार भंडारे यांचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा थोरतांनी यावेळी दाखवले आणि काय खरं काय खोटं? हे सगळंच जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांनी सोशल मीडियावरून “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल” अशी धमकी बाळासाहेब थोरात यांना दिली. या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या धमकीच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये शांती मोर्चा काढण्यात आला होता.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहादरम्यान एक वाद झाला होता. या प्रकरणी आठ ते दहा कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांनी सोशल मीडियावरून “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल” अशी धमकी बाळासाहेब थोरात यांना दिली होती.
