Bangladesh : भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने आधी ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे….

Bangladesh : भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने आधी ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे….

| Updated on: May 03, 2025 | 1:41 PM

बांगलादेशी मेजर जनरल फजलुर रहमानने वादग्रस्त वक्तव्य करताना भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवण्याचे आवाहन केले. या वक्तव्यावर बांगलादेश सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

भारत देशासोबत आमचे मैत्रिपूर्ण संबंध असल्याचे आता बांगलादेश सरकारकडून सांगण्यात येतंय. निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलुर रहमान गेल्या काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर फजलुर रहमानच्या विधानावर बोलताना बांगलादेश सरकारकडून एक स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. फजलुर रहमानने आपलं वैयक्तिक मत व्यक्त केलं आहे, असं म्हणत भारतासोबत आपले मैत्रिपूर्ण संबंध असल्याचे म्हणत बांगलादेश सरकारकडून सारवा-सारव करण्यात आल्याचे पाहायला मिळतंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान मेजर जनरल फजलुर रहमानने गरळ ओकली होती. पाकिस्नावर भारताने हल्ला केल्यास बांगलादेशाने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवावा, असं वक्तव्य मेजर जनरल फजलुर रहमान याने केलं होतं.

Published on: May 03, 2025 01:41 PM