Beed News : बीडमध्ये लग्नाळू मुलांना लाखोंचागंडा घालणारी टोळी जेरबंद
Beed Crime News : लग्नाळू मुलांना आणि त्यांच्या कुटुंबाला फसवणाऱ्या टोळीला बीडच्या पोलिसांनी पकडलं आहे.
बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या टोळीने वडवणी तालुक्यात तसंच आष्टी तालुक्यातल्या 2 तरुणांना फसवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आधीच लग्नासाठी मुलांना मुली भेटत नसल्याचं वास्तव असताना दुसरीकडं लग्नाळू मुलांना फसवणारी टोळी सक्रिय झाल्यानं, लग्नळू मुलं आणि त्यांच्या कुटुंबाने धास्ती घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या टोळीला पकडलं असल्याचं बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, याबद्दल बोलताना कॉवत म्हणाले की, आम्हाला याबद्दल तक्रार मिळाल्यानंतर लागलीच आम्ही सापळा लाऊन या टोळीला पकडलं आहे. मात्र, अशा अजून काही टोळ्या आहेत. यामध्ये लग्न लावतात आणि दोन ते चार दिवसाच्या आत ते पळून जातात. या ठिकाणी मुलाच्या घरातील मौल्यवान वस्तू, दाग- दागिने घेऊन पळून जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील तरुणांनी अशा टोळ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमची आर्थिक, मानसिक व कौटुंबिक हानी होणार नाही, असं आवाहन कॉवत यांनी केलं आहे.
