Beed : बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचा आणखी एक कारनामा, तिला कॅबिनमध्ये बोलवलं अन्.. पालकांचा खळबळजनक आरोप

Beed : बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचा आणखी एक कारनामा, तिला कॅबिनमध्ये बोलवलं अन्.. पालकांचा खळबळजनक आरोप

| Updated on: Jul 02, 2025 | 9:47 AM

बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. बघा काय झालं समोर?

बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोघांची काल पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय. आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी दिली जाते की त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असताना या विनयभंग प्रकरणातील आरोपी विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी आणखी एका विद्यार्थिनीचा छळ विजय पवारने केला होता. दोन वर्षांपूर्वी विजय पवारने या विद्यार्थिनीला आपल्या कॅबिनमध्ये बोलवलं होतं आणि त्यानंतर या विद्यार्थिनीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता, असा आरोप या विद्यार्थिनीच्या पालकांकडून करण्यात येत आहे. ‘विजय पवारने माझ्या मुलीवरही असाच अन्याय अत्याचार केला आहे. दोन वर्षांपासून विजय पवारची तक्रार जिल्हा अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र कोणताही न्याय मिळाला नाही. मी हिंमत करून आज ही तक्रार केली’, असं पालकांनी म्हटलंय.

Published on: Jul 02, 2025 09:45 AM