डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ आला समोर
मुंबईत सिद्धार्थ कॉलेजजवळ बेस्टच्या डबलडेक्कर बसला विचित्र अपघात झाला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबईत सिद्धार्थ कॉलेजजवळ बेस्टच्या डबलडेक्कर बसला विचित्र अपघात झाला आहे. मॅनहॉलचं झाकण बसच्या बॅटरीला लागल्याने आग लागली आहे. बसचं पुढचं चाक या मॅनहॉलवर आल्यानंतर मॅनहॉलचं झाकण उघडलं गेलं आणि त्यानंतर हे झाकण बसच्या बॅटरीला लागल्याने बसला आग लागली. आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी यावेळी बसमधून उड्या घेतल्या. ही डबल डेकर बस सीएसएमटीकडून मंत्रालयाकडे जात होती. आग लागताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर बसमधील सर्व प्रवासी लगेच खाली उतरले. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच घटनास्थळी दाखल होत या आगीवर नियंत्रन मिळवलं. मात्र यामुळे परिसरात धुराचे लोट दिसून आले. तर अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली असून या घटनेमुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
Published on: Jul 15, 2025 01:52 PM
