VIDEO : Bharat Bandh | भारत बंदची हाक, सोलापुरात मात्र दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरु

VIDEO : Bharat Bandh | भारत बंदची हाक, सोलापुरात मात्र दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरु

| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 1:02 PM

‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. त्या अनुशंगाने दिल्ली येथे तर बंदोबस्त वाढविण्यात आला आहेच शिवाय राज्यातील शेतकरी संघटना आणि काही पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, भारत बंद असूनही सोलापुरात दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत. 

केंद्र सरकारने (Centre Government) तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे (Farmer) आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. त्या अनुशंगाने दिल्ली येथे तर बंदोबस्त वाढविण्यात आला आहेच शिवाय राज्यातील शेतकरी संघटना आणि काही पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, भारत बंद असूनही सोलापुरात दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत.