Bharat Gogawale Video : ‘असं उलटं विचारू नको जरा थांब, घाई कशाला…’; पालकमंत्रिपदावरील प्रश्नावर गोगावलेंचं मिश्किल उत्तर
अजित पवार गट राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं आहे. त्यावरून भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
राज्यातील काही जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच रायगड पालकमंत्रिपदाचा वाद आता अजित पवारांकडे गेला असून भरत गोगावले अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. अजित पवार गट राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं आहे. त्यावरून भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गोगावले यांना हे पद मिळण्याची अपेक्षा होती. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळेच आज भरत गोगावले अजित पवारांच्या भेटीसाठी गेले असावेत का? अशी चर्चाही सुरू होती. दरम्यान, भरत गोगावले यांनी भेटी पूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. रायगडला सहपालकमंत्रिपद भेटले तर तुम्ही त्या निर्णयाला सहमत असाल का? असा सवाल केला असता गोगावले म्हणाले, “आता तुम्हाला काही सांगत नाही. दोन दिवसांत पालकमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेते दोन दिवसांत निर्णय घेतील. सध्यातरी पालमंत्रिपदाचा वाद थांबला आहे.” तर तुम्ही पालकमंत्री झालात असे समाजायचे का? असा सवाल केल्यावर ते मिश्किलपणे म्हणाले, “असे उलटे काही विचारू नको. जरा थांब, घाई कशाला करतो आहे… सकारात्मक बातमी मिळेल, असे वाटते आहे.”
