Bharat Gogawale : महिलांनी किती हस्तक्षेप करावा याला मर्यादा.., मंत्री गोगवलेंचं रश्मी ठाकरेंबाबत मोठं विधान

Bharat Gogawale : महिलांनी किती हस्तक्षेप करावा याला मर्यादा.., मंत्री गोगवलेंचं रश्मी ठाकरेंबाबत मोठं विधान

| Updated on: Jun 15, 2025 | 2:51 PM

Bharat Gogawale Statement On Rashmi Thackeray : भरत गोगवले यांनी शिवसेनेसंदर्भात, ठाकरेंसंदर्भात आणि तिथल्या कारभारासंदर्भात मोठे दावे केलेले आहेत.

याआधीही आम्ही सांगितलंय की महिलांनी किती हस्तक्षेप करावा याला काही मर्यादा असतात, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री भरत गोगवले यांनी शिवसेना ठाकरे गट आणि रश्मी ठाकरे यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. शिंदेंच्या गटाने बंड केला. त्यामागे पक्षातला रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप हे कारण होतं असा आरोप गोगवले यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

यावर बोलताना गोगवले म्हणाले की, मी काल बोलून गेलो की त्यावेळी जर शिंदे साहेबांना आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद दिलं असतं, तर फार वेगळं चित्र असतं. परंतु, ठीक आहे.. काही कारणास्तव आम्ही समजू शकलो. परंतु आदित्य ठाकरेला जे मंत्रीपद दिलं, ते कुठल्याच शिवसैनिकाला पटलं नाही. आम्ही कधी बाळासाहेबांना भेटायला गेलो, की ते आमच्या पाठीवर थाप मारायचे, काय-कसं चाललंय अशी आमची विचारपूस करायचे. एकदा मी माझ्या वाढदिवशी त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. तेव्हा आम्ही सर्व पदाधिकारी खाली बसलो होतो. बाळासाहेबांनी मला सांगितलं की, खाली बसायचं नाही, इथे माझ्या बाजूला बसायचं. खुर्ची देणाराही मी आहे आणि घेणाराही मीच आहे. ही आपुलकी आम्ही त्यावेळी अनुभवली होती. म्हणून आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक होतो, असंही यावेळी बोलताना गोगवले यांनी म्हंटलं आहे.

Published on: Jun 15, 2025 02:50 PM