शिंदे गट अजित पवार यांच्यावर नाराज? भरत गोगावले म्हणतात, “अजितदादांना आम्हाला न्याय द्यावाच लागेल”
अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाची अडचण झाल्याची चर्चा आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.
मुंबई : अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाची अडचण झाल्याची चर्चा आहे. अजित पवारांवर टीका करूनच एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात संधी दिल्याने शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावरून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. भरत गोगावले म्हणाले की, “शिंदे-फडणवीस यांचं ऑपरेशन सुरू होत, म्हणून आम्हाला थांबवल होत, आता ऑपरेशन सक्सेस झालं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होईल. अजित पवार गेल्यावेळीसारखं करणार नाहीत. मुख्यमंत्री आणि देवेंद्र काळजी घेतील. अजित पवार यांना आम्हाला न्याय दिला पाहिजे. मंत्रिमंडळविस्तारात माझा नंबर नक्की लागले.”
Published on: Jul 04, 2023 03:31 PM
