भावना गवळींना चिकनगुनियाची लागण, आजही ईडी समोर हजर राहणार नाहीत

भावना गवळींना चिकनगुनियाची लागण, आजही ईडी समोर हजर राहणार नाहीत

| Edited By: | Updated on: Oct 20, 2021 | 10:59 AM

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीकडे 15 दिवसांची मुदत मागितली असून आज त्या ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. भावना गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई: शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीकडे 15 दिवसांची मुदत मागितली असून आज त्या ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. भावना गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ही माहिती दिली आहे. भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. तसेच पुढील 15 दिवस गैरहजर राहण्यासाठी त्यांनी ईडीकडून वेळ मागितला असल्याचंही इंद्रपाल सिंग यांनी सांगितलं. भावना गवळी यांच्याकडून ईडीला प्रकृतीच्या अस्वस्थाबाबतचं पत्रं देण्यात येणार असून मेडिकल सर्टिफिकेटही देण्यात येणार आहे.