VIDEO : Pankaja Munde | केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार जबाबदारी झटकू शकत नाही – पंकजा मुंडे

VIDEO : Pankaja Munde | केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार जबाबदारी झटकू शकत नाही – पंकजा मुंडे

| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 4:00 PM

ओबीसी आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी राज्य सरकारला घेरलं. तसेच केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार जबाबदारी झटकू शकत नाही असं ही पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून संरक्षण देण्याचं राज्य सरकारचं ढोंग करत आहे, असा थेट हल्ला त्यांनी केला.

ओबीसी आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी राज्य सरकारला घेरलं. तसेच केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार जबाबदारी झटकू शकत नाही असं ही पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून संरक्षण देण्याचं राज्य सरकारचं ढोंग करत आहे, असा थेट हल्ला त्यांनी केला. त्या मुंबईत बोलत होत्या. यावेळी पंकजा म्हणाल्या की, ओबीसी आणि बहुजनांना अंधारात लोटणारा निर्णय या सरकारच्या काळात झाला. ओबीसीचं आरक्षण रद्द झालं. ओबीसीचं आरक्षण स्थगिती होण्यापासून रद्द होईपर्यंत जो कालावधी मिळाला त्यात पावलं उचलली असती, तर आरक्षण वाचलं असतं, असा दावा त्यांनी केला.