Ashish Shelar : राज ठाकरे यांच्या ‘हिंदी’ विरोधानंतर आशिष शेलार आक्रमक; म्हणाले, जरा अभ्यासपूर्ण…

Ashish Shelar : राज ठाकरे यांच्या ‘हिंदी’ विरोधानंतर आशिष शेलार आक्रमक; म्हणाले, जरा अभ्यासपूर्ण…

| Updated on: Apr 17, 2025 | 6:53 PM

आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे पहिलीपासूनच मराठी आणि इंग्रजीबरोबरच हिंदी भाषा सुद्धा सक्तीची करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात आता पहिलीपासून मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजीबरोबर आता हिंदी सक्तीची करण्यात आली आहे. यावरून राज ठाकरे भडकले असून पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याच्या नव्या शैक्षणिक धोरणावरून राज ठाकरे भडकलेत. हिंदू आहोत हिंदी नाही संघर्ष अटळ असल्याचा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली. मी स्वच्छ शब्दांमध्ये सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते महाराष्ट्रामध्ये आम्ही यशस्वी होऊ देणार नाही’, असे राज ठाकरे म्हणाले. यावरून भाजपच्या आशिष शेलार यांनी फटकारल्याचे पाहायला मिळाले. ‘राज ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण बोलावं’, असं आशिष शेलारांनी म्हटलं. राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना शेलार म्हणाले, अभ्यासपूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजेत ही माझी अपेक्षा आहे. पण त्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील..

Published on: Apr 17, 2025 06:53 PM