Chitra Wagh : नानांच्या नाना कळा अन् पाकिस्तान्यांचा यांना भलताच कळवळा… चित्रा वाघ यांचा काँग्रेसच्या पटोलेंवर संताप
एकंदरीत काय तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच ….देशद्रोह... काँग्रेसचा हात आणि दहशदवादाला साथ हेच आता वारंवार सिद्ध होतेय… असं म्हणत चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांनी चांगलंच फटकारलंय.
नानांच्या नाना कळा… पाकिस्तान्यांचा या नांनाना भलताच कळवळा, असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांच्या कॉम्प्युटरवरचा गेम, अशी नुकतीच टीका नाना पटोले यांनी केली होती. यावरूनच चित्रा वाघ यांनी पलटवार करत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत पटोलेंवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘ऑपरेशन सिंदूरमध्ये पहलगाममध्ये ज्या मातांचं कुंकू पुसलं गेलं त्यांचा हुंकार होता. आपल्या भारतीय जवानांनी जीव पणाला लावून दहशतवादाविरोधात उभं राहून मोठ्या शौर्यानं त्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं.’ तर भारतीय जवानांच्या शौर्याला तुम्ही लहान मुलांच्या गेमची उपमा देताय? असा सवाल करत पटोलेंना चांगलंच फटकारल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Jun 12, 2025 01:05 PM
