Aaditya Thackeray यांना कुणी केला खोचक सवाल, ‘अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?’
VIDEO | ब्रिटनवरून भारतात आणण्यात येणारी वाघनखं खरी आहे की खोटी? ती वाघनखं खरचं शिवरायांनी वापरली आहेत का? विरोधकांच्या प्रश्नावर भाजपनं फटकारलं, आशिष शेलार म्हणाले, 'वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले? छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले'
मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | ‘वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले?’, असा सवाल करत भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. तर छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेआता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले आहेत असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. शेलार पुढे असेही म्हणाले, आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय आहे. इथे हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय? महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय? आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का? यांना वाघ नखं टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात? असा खोचक सवाल करत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना पुन्हा डिवचले आहे. तर अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का? अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?’, असे म्हणत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
