आम्ही विचारलेला प्रश्न भाजपला एवढा का झोंबला?

आम्ही विचारलेला प्रश्न भाजपला एवढा का झोंबला?

| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 8:32 PM

नाना पटोले यांच्या विरोधात आता भाजप राज्यभर पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोले यांच्या विरोधात कार्यकर्त्याना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिलेत.

मुंबई : पंतप्रधान हे फक्त भाजपचे नाहीत तर ते सर्व देशाचे राहिलेत. पंतप्रधान मोदी यांच्याबाबत झालेल्या घटनेनंतर ज्या पद्धतीने यांची वक्तव्य येतात ती निर्लज्ज पदाची आहेत. मी आता भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगणार आहे की नाना पटोले यांच्या विरोधात राज्यभरात तक्रार दाखल करा कारण ते दशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर वाटेल ते बोलत आहेत. नाना पटोले यांच्या विरोधात आता भाजप राज्यभर पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोले यांच्या विरोधात कार्यकर्त्याना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिलेत.