Chitra Wagh | सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? : चित्रा वाघ

Chitra Wagh | सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? : चित्रा वाघ

| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 7:09 PM

महिलांवर झालेल्या अत्याचारासंदर्भात आरोपींना जामीन मिळता कामा नये. यावर कायदा करायला पाहिजे. गौरी गायकवाड यांचे प्रकरण हे राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.  

मुंबई : महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली. महिला सरपंचांच्या मान मर्यादा भंग झाल्या आहेत. महिलांवर झालेल्या अत्याचारासंदर्भात आरोपींना जामीन मिळता कामा नये. यावर कायदा करायला पाहिजे. गौरी गायकवाड यांचे प्रकरण हे राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.