Nitesh Rane | संजय राऊतांनी जेवढ्याच तेवढं रहावं नाहीतर कुंडली काढू : नितेश राणे
संजय राऊतांनी जेवढ्यात तेवढं राहावं नाहीतर कुंडली काढू. सेनेबद्दल आकस नाही, समोरून टीका टिप्पणी होत असेल तर गप्प बसणार नाही. संजय राऊत हे शरद पवारांचे लोंबते, त्यांना सेनेशी काही घेणं देणं नाही, अशी प्रतिक्रिया देत नितेश राणे संजय राऊतांचा खरपूर समाचार घेतला आहे.
मुंबई : नारायण राणेंनी सेना सोडली तेव्हा सामना समोरच्या सभेमध्ये संजय राऊत बाथरूममध्ये लपले होते. समोर आला तर त त फ फ होते, तो धमक्यांची भाषा करतो. आम्ही खांद्यावर बंदूक ठेवत नाही. सेनाभवन बाळासाहेबांबाबत आदर. लोकप्रभामध्ये असताना संजय राऊतांनी बाळासाहेबांसाठी काय भाषा वापरली होती ते पहावं, नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन सांगतो त्यांनी काय म्हणटलं होतं. संजय राऊतांनी जेवढ्यात तेवढं राहावं नाहीतर कुंडली काढू. सेनेबद्दल आकस नाही, समोरून टीका टिप्पणी होत असेल तर गप्प बसणार नाही. संजय राऊत हे शरद पवारांचे लोंबते, त्यांना सेनेशी काही घेणं देणं नाही, अशी प्रतिक्रिया देत नितेश राणे संजय राऊतांचा खरपूर समाचार घेतला आहे.
