‘ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते’, नाव न घेता संजय राऊत यांच्यावर कुणाचा निशाणा?
VIDEO | 'तुम्ही कितीही आव्हानं द्या किंवा दिल्लीतून सैन्य बोलवा आम्हाला काहीच फरक पडत नाही. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे', ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या निर्धावर भाजपचे नेते नितेश राणे यांचा पलटवार, बघा काय दिलं प्रत्युत्तर
मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | ‘कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार’, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निर्धार व्यक्त केला आहे. तर तुम्ही कितीही आव्हानं द्या किंवा दिल्लीतून सैन्य बोलवा आम्हाला काहीच फरक पडत नाही. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचे म्हणत राऊतांनी शिंदे गटाला थेट आव्हानच दिलं तर यावर भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर देत चांगलेच फटकारले आहे. नितेश राणे म्हणाले, खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आली आहे. त्याच जुन्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा आणि ढेकणांना मारण्यासाठी आम्हाला लष्कराची आवश्यकता नाही. ढेकणं मारण्यासाठी स्प्रे मारतो. हवं तर ते आम्ही भांडूपला पाठवून देतो. जेणे करून सकाळचा मच्छर वाजायचा बंद होईल, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत खोचक टोला लगावला आहे.
