Nitesh Rane : भाजप मंत्री नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर अन् चर्चांना उधाण
शाश्वत, सुसंलग्न आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असा सागरी महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने.. या समिटचे उद्घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून आज १६ जुलै रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० पर्यंत हा कार्यक्रम मुंबईतील नरिमन पॉईंट येथील द रिगल रुम, होटेल ट्रायडन्ट येथे असणार आहे.
मंत्री नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर असल्याने चर्चांना उधाण आलंय. ठाकरे गट शिवसेनेचं मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामना या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर राज्य सरकारची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या मुंबईत राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान, भाजपचे नेते मंत्री नितेश राणे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये राजकीय सामना पाहायला मिळत असताना या वादादरम्यान, मंत्री नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या पहिल्या पानावर छापल्याचे पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळ मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागातफ्रे महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५ चं आयोजन करण्यात आलंय. या संदर्भातील एक जाहिरात आज प्रसिद्ध झाल्याचे पाहायला मिळतंय.
