‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करा’, अतुल भातखळकर यांचा टोला

| Updated on: Oct 17, 2021 | 7:52 PM

24 ऑक्टोबर रोजी परीक्षार्थींना एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महा-पराक्रम’ करण्यात आला आहे. या परीक्षार्थींनी ही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे टोपे साहेब या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी आता हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था कराच, असा टोला भातखळकर यांनी लगावलाय.

Follow us on

आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरुच आहे. अशावेळी भाजप नेते महाविकास आघाडी सरकार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधलाय. ‘सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याच्या महापापाची पुनरावृत्ती करण्याचे काम महाभकास आघाडी सरकारने केलं आहे, अशी टीका भातखळकर यांनी केलीय.