Medha Kulkarni : भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा व्हिडीओ व्हायरल; पुण्याच्या मशिदीत नेमकं काय घडलं?

Medha Kulkarni : भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा व्हिडीओ व्हायरल; पुण्याच्या मशिदीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 17, 2025 | 3:58 PM

Mp Medha Kulkarni Video : भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मशिदीत घुसून गोंधळ घातला असल्याचा आरोप होतो आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मशिदीत घुसून गोंधळ घातला असल्याचा आरोप होतो आहे. 13 एप्रिलला मेधा कुलकर्णी यांनी मशिदीत घुसून गोंधळ घातला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्याच्या छोटा शेख सल्लाहुद्दी दर्ग्याच्या मशिदीतला एक व्हिडीओ समोर आला आहे. मेधा कुलकर्णी यांना अटक करा अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीकडून करण्यात आली आहे.

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आणलेलं आहे. यात त्यांनी दावा केला आहे की, भाजपच्या नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या छोटा शेख सल्लाहुद्दी दर्ग्याच्या मशिदीत गोंधळ घातला. या मशिदीत घुसण्याचा प्रयत्न मेधा कुलकर्णी यांच्याकडून झाला. त्यामुळे शहरातली शांतता भंग होऊन कुलकर्णी यांच्या कृत्यामुळे धार्मिक वातावरण बिघडत असल्याचं म्हणत कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Published on: Apr 17, 2025 03:58 PM