Narayan Rane : स्वबळावर सत्ता स्थापन करणार? 15 आमदार संपर्कात… वेटिंगवरील ‘ते’ चेहरे कोण? नारायण राणेंचा मोठा दावा

Narayan Rane : स्वबळावर सत्ता स्थापन करणार? 15 आमदार संपर्कात… वेटिंगवरील ‘ते’ चेहरे कोण? नारायण राणेंचा मोठा दावा

| Updated on: Jun 10, 2025 | 5:53 PM

भाजप 125 आमदार आहेत... आणि वेटिंगवर 15 आहेत... कोणत्या पक्षाचे आहेत ते सांगायचं नाही. आमचं राज्यात व्यवस्थित सुरू आहे. आमचा नांदा सौख्य भरे सुरू आहे, असं नारायण राणे म्हणाले. स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करण्याचा काहीही विषय नाही

भाजपच्या नारायण राणे यांनी एक मोठा दावा केला आहे. आमच्या संपर्काच १५ आमदार असल्याचा मोठा दावा करत महायुतीत चांगलं चाललं असल्याचे नारायण राणे म्हणालेत. मात्र कोणत्या पक्षाचे आमदार भाजपच्या संपर्कात आहे? याचं उत्तर देणं मात्र नारायण राणे यांनी टाळल्याचे पाहायला मिळत आहे. ‘भारतीय जनता पक्ष हा देशात आणि राज्यात सत्तेवर आहे. राज्यात १३४ तर १५ आमदार वेटिंगवर आहेत. म्हणजे बहुमत होतंय ना… काही काळजी करू नका आम्ही पाच वर्ष सत्तेत असणार आहोत.’, असा विश्वासही नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला. नारायण राणे यांनी केलेल्या या दाव्यानंतर पत्रकारांनी ते १५ आमदार कोण? असा सवाल केला असता नारायण राणे म्हणाले ते सांगायचं नसतं. बातमी फोडू नका, असं मिश्कील उत्तर नारायण राणे यांनी दिलं.

Published on: Jun 10, 2025 05:53 PM