Nitesh Rane : ‘2-3 टकले सोडले तर हे सरकार पूर्ण…’, नितेश राणेंचा रोख अजितदादांकडे? नेमकं काय म्हणाले?

Nitesh Rane : ‘2-3 टकले सोडले तर हे सरकार पूर्ण…’, नितेश राणेंचा रोख अजितदादांकडे? नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Apr 18, 2025 | 4:09 PM

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते नितेश राणे नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसताय. अशातच नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याने त्यांची चांगलीच चर्चा होताना दिसतेय.

दोन ते तीन टकले सोडले तर हे सरकार पूर्ण तुमचं… असं वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील हिंदू विराट सभेमध्ये नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे. नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांचा रोख हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे होता का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसतेय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर चर्चांना चांगलंच उधाण आल्याचे पाहायला मिळतंय.

काय म्हणाले नितेश राणे?

‘हिंदू म्हणून हिंमतीने आणि अभिमानाने महाराष्ट्रात राहा. तुम्हाला पाहिजे तिथे भगवा फडकवा.. तुम्हाला काहीही होणार नाही. याची जबाबदारी हा नितेश राणेंची आहे. काही चिंता करू नका… दोन-चार टकले सोडले तर हे सरकार हे पूर्ण तुमचं आहे.’, असं नितेश राणे म्हणाले.

Published on: Apr 18, 2025 04:09 PM