Nitesh Rane : … म्हणून ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन पेंग्विन हे नाव योग्य, नितेश राणे यांचा टोला काय?

Nitesh Rane : … म्हणून ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन पेंग्विन हे नाव योग्य, नितेश राणे यांचा टोला काय?

| Updated on: Jun 05, 2025 | 5:41 PM

दोन कुटुंब एकत्र येत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत दोन कुटुंब एकत्र येणे चांगलीच गोष्ट आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतायत या प्रश्नावर मंत्री राणे यांनी खोचक टोला लगावत उत्तर दिले

उद्धव ठाकरे गटाचे कोण फोडायचे असेल तर ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन पेंग्विन करायला पाहिजे, असं मंत्री नितेश राणे यांनी खोचकपणे म्हटलंय. टायगर आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नाही त्यामुळे ऑपरेशन पेंग्विन हेच नाव योग्य असेल असा टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. यावर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी ऑपरेशन टायगरचे नाव बदलून ऑपरेशन पेंग्विन हे नाव ठेवण्याचा अप्रत्यक्षपणे सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. सांगोला येथे वीरशैव लिंगायत समाजाचे बहुउद्देशीय समाजाच्या सभागृहाचे भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.

Published on: Jun 05, 2025 05:41 PM