Cabinet Expansion 2024 : फडणवीस सरकारमध्ये भाजपच्या पंकजा मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ, कोणतं खातं मिळणार?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली. २०२४ ला विधान परिषदेत आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पंकजा मुंडे यांचा परळी मतदासंघ आहे.
नागपुरात राज भवन येथे आज देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा सोहळा पार पडत आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात येत आहे. भाजपकडून नव्या मंत्रिमंडळात तब्बल 9 नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली. २०२४ ला विधान परिषदेत आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पंकजा मुंडे यांचा परळी मतदासंघ आहे. महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या एक दशकाहून अधिक काळ पंकजा मुंडे हे नाव कायम चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. आधी विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या विधान परिषदेत पोहोचल्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत त्या विजयी झाल्याचे पाहायला मिळाले.
