केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासमोर घोषणाबाजी, गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांच्या नावानं घोषणा

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासमोर घोषणाबाजी, गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांच्या नावानं घोषणा

| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 12:57 PM

भागवत कराड भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर गोपीनाथ मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. 

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रेला आज सुरुवात झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात बीड जिल्ह्यातील परळी येथून करण्यात आली. भागवत कराड भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर गोपीनाथ मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली.   गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. पंकजा मुंडे यांनी मात्र कार्यकर्त्यांना खूप झापलं आहे. आपल्या पक्षाची यात्रा असताना घोषणाबाजी कशाला करता, असा सवाल त्यांनी केलाय.