‘या’ तीन राज्यातील निवडणुकीत भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?

‘या’ तीन राज्यातील निवडणुकीत भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?

| Updated on: Dec 05, 2023 | 10:25 AM

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा कमळ फुललंय त्यामुळे उत्तर भारतात पुन्हा एकदा मोदी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप विजयाचा महाराष्ट्रात परिणाम होणार का याची चर्चा रंगतेय. तेलंगणा राज्य सोडलं तर तिनही राज्यात भाजपनं काँग्रेसला चारही मुंड्या चित केलंय

मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : पाचपैकी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. तर भाजपला पराभूत करू या विश्वासात असणाऱ्या काँग्रेसला याचा मोठा झटका बसला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा कमळ फुललंय त्यामुळे उत्तर भारतात पुन्हा एकदा मोदी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप विजयाचा महाराष्ट्रात परिणाम होणार का याची चर्चा रंगतेय. तेलंगणा राज्य सोडलं तर तिनही राज्यात भाजपनं काँग्रेसला चारही मुंड्या चित केलंय. भाजपच्या या विजयानंतर महाराष्ट्रातही मोठा जल्लोष करण्यात आला. मुंबईत प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चित्रा वाघ यांनी जोरदार घोषणा देत एकमेकांना पेढे भरवले. तर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर अशातच तिन्ही राज्याच्या निकालात भाजपच्या विजयाचा महाराष्ट्रात काय परिणाम होणार? असा सवाल केला जातोय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 05, 2023 10:25 AM