Pooja More Candidacy Row: भाजपच्या पूजा मोरे यांच्या वादात आता ‘मराठा’ अँगल, उमेदवारी घेतली मागे अन् ट्रोलिंग चर्चेत
पुणे महापालिकेत भाजपने पूजा मोरेंना दिलेली उमेदवारी ट्रोलिंगमुळे मागे घेण्यात आली. मात्र, यात आता मराठा अँगल जोडला जात आहे. बीडमधील काही संघटनांनी मोरेंना मराठा आंदोलनात सक्रिय असल्यामुळे डावलले गेले का, असा सवाल केला आहे. त्यांच्या पालकांनीही पक्षाने शहानिशा करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
भाजप समर्थकांच्या ट्रोलिंगनंतर भाजपने पुण्यात पूजा मोरे यांना दिलेली उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले. मात्र, या घटनेत आता मराठा अँगल जोडला जात आहे. बीड जिल्ह्यातील काही संघटनांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पूजा मोरे यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी पक्ष, मराठा आंदोलन आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांच्या जुन्या भूमिकांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप समर्थकांनी त्यांना ट्रोल केले. याची दखल घेत भाजपने मोरेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. पूजा मोरेंच्या आई-वडिलांनी आरोप केला आहे की, पक्षाने ट्रोलर्सच्या दबावाखाली न येता शहानिशा करायला हवी होती. मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या तरुणीला डावलले गेले का, असा सवाल गेवराई येथील संघटनांनी उपस्थित केला आहे. समाजसेवेसाठी सक्रिय असलेल्या कार्यकर्त्याला ट्रोल करून मानसिक त्रास दिला जाणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
