BKC Traffic : बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडण्यासाठी 25 कोटी खर्च करण्याची नामुष्की
MMRDA cycle track removal : बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना म्हणून 10 किलोमीटरचा सायकल ट्रॅक काढण्यात येणार आहे.
बिकेसीमध्ये असलेला सायकल ट्रॅक उखडण्यासाठी 25 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी एमएमआरडीएकडून कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जवळपास 10 किलोमीटर लांबीचे हे बिकेसीमध्ये सायकल ट्रॅक आता काढून टाकण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उद्देशाने रास्ता रुंदीकरण करता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
बिकेसीमध्ये दिवसेंदिवस कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यावर उपाय म्हणून आता कोटी खर्चून तयार केलेल सायकल ट्रॅक काढून टाकण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 25 कोटी रुपये खर्च करण्याची नामुष्की पालिकेवर उद्भवली आहे. त्यासाठी कंत्राटदारांना नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे.
Published on: May 12, 2025 11:25 AM
