Maratha Reservation Rally : 266 टॉयलेट, 11 पाण्याचे टँकर… आझाद मैदानावर मराठा आंदोलकांसाठी BMC कडून बघा कशी व्यवस्था?
आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी जमली आहे. यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सरकारसमोर हे आंदोलन नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात संविधानिकदृष्ट्या योग्य तोडगा शोधण्याचे आश्वासन दिले आहे.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारी यंत्रणावर ताण येण्याची शक्यता आहे. आझाद सुरू असलेले आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या आंदोलनाला पोलिसांनी सुरूवातीला एक दिवसाची परवानगी दिली होती. परंतु, जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे आणि त्यांच्या बेमुदत उपोषणाच्या इशाऱ्यामुळे पोलीस प्रशासनाने आंदोलनाला आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे.
जरांगे पाटील आरक्षण मिळेपर्यंत ते आपले आंदोलन सुरूच ठेवतील, असा स्पष्ट निर्धार मनोज जरांगे पाटील आहे. या आंदोलनात मुंबईत 3000 हून अधिक वाहनांमध्ये हजारो मराठा आंदोलक दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्यासाठी कोणतीच व्यवस्था कऱण्यात आली नसल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे आझाद मैदानावर चिखल झाल्याने आंदोलकांचे हाल झाले. तर पाणी आणि स्वच्छता गृहाची व्यवस्था नसल्याने मुख्यमंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्यानंतर बीएमसीकडून बघा कशी व्यवस्था करण्यात आली आहे.
