राज ठाकरेंकडून मनसे पक्ष उद्धव ठाकरेंकडे पूर्णपणे सरेंडर, भाजपवासी झालेल्या संतोष धुरी यांचा दाव्यानं खळबळ

राज ठाकरेंकडून मनसे पक्ष उद्धव ठाकरेंकडे पूर्णपणे सरेंडर, भाजपवासी झालेल्या संतोष धुरी यांचा दाव्यानं खळबळ

| Updated on: Jan 06, 2026 | 4:26 PM

राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांत बदल करून शिवसेना (उबाठा) सोबत अधिक जवळीक साधली आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्षांमधील ऐक्य वाढण्याची शक्यता आहे. मात्र, गेले काही महिने दोघांनी एकत्रितपणे विविध सभांमध्ये सहभाग घेतला, लोकांशी बातचीत केली आहे. या राजकीय घडामोडीमुळे भविष्यात महाराष्ट्रातील राजकरणात मोठे बदल दिसू शकतात आणि भाजपासह विरोधी पक्ष यांच्यातील तणाव आणखी वाढू शकतो.

बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का, मनसे अध्यक्ष संतोष धुरी यांनी भाजप नेते अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर संतोष धुरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संतोष धुरी म्हणाले, आम्ही मनसे मधून नगरसेवकापासून काम केली, आमचं रक्त भगवं आहे. धुरींनी आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून दिली, की २००७ मध्ये राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली, तेव्हा ते शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांच्यासोबत आले होते. त्यांनी मनसेमध्ये विविध पदे भूषवली, ज्यात शाखाध्यक्ष आणि नगरसेवकपदाचा समावेश आहे. त्यांनी मनसेच्या कारभारात सक्रिय सहभाग घेतला होता, असे ते म्हणाले.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना धुरींनी मनसेच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ते म्हणाले की, पक्षातील काही मंडळी बाहेर पडून ज्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच राज ठाकरे यांनी जवळ केले. या मंडळींनी आता पक्षाचा पूर्णपणे ताबा घेतला असून, राज ठाकरे यांनी मनसे पूर्णपणे त्यांच्याकडे सरेंडर केली आहे, असा दावा धुरींनी केला. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांत बदल करून शिवसेना (उबाठा) सोबत अधिक जवळीक साधली आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्षांमधील ऐक्य वाढण्याची शक्यता आहे. मात्र, गेले काही महिने दोघांनी एकत्रितपणे विविध सभांमध्ये सहभाग घेतला, लोकांशी बातचीत केली आहे. या राजकीय घडामोडीमुळे भविष्यात महाराष्ट्रातील राजकरणात मोठे बदल दिसू शकतात आणि भाजपासह विरोधी पक्ष यांच्यातील तणाव आणखी वाढू शकतो.

Published on: Jan 06, 2026 04:26 PM