Video : विकी आणि कतरिनाला जीवे मारण्याची धमकी

Video : विकी आणि कतरिनाला जीवे मारण्याची धमकी

| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 12:26 PM

विकी आणि कतरिनाला जीवे मारण्याची धमकी

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) या दोघांना सोशल मीडियावर एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची (death threats) धमकी देण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमैत्रिणींसोबत हे दोघं नुकतेच मालदिवला गेले होते. मालदिव व्हेकेशनचे बरेच फोटो आणि व्हीडीओ ते गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. त्यांना सोशल मीडियावर धमकी देण्यात आली आहे.  याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य राजपूत नावाचा एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून कतरिनाला स्टॉक करत होता. विकीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही तो कतरिनाला स्टॉक करत होता. अखेर विकीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.