Mahim Rain Updates : माहीममध्ये इमारतीचा काही भाग कोसळला, 2 कुटुंबांचा संसार उघड्यावर

Mahim Rain Updates : माहीममध्ये इमारतीचा काही भाग कोसळला, 2 कुटुंबांचा संसार उघड्यावर

| Updated on: May 26, 2025 | 5:04 PM

Heavy Rainfall In Mumbai : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने माहीममध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. यात जीवित हानी झालेली नसली तरी वित्तहानी झालेली आहे.

मुंबईच्या माहीममध्ये पितांबर लेन परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे हाजी कासम या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. तर माहीममध्येच दुसऱ्या एका भागात झाड देखील कोसळलं आहे.

मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी सचल्याने हे पाणी नागरिकांच्या घरात देखील शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांचं नुकसान झालेलं आहे. माहीममध्ये देखील मुळसधार पावसाने पितांबर लेन येथे असलेल्या हाजी कासम या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

Published on: May 26, 2025 05:04 PM