सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीला राज्यात सशर्त परवानगी
महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यती(Bullock Cart Race)ला परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)नं शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे
महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यती(Bullock Cart Race)ला परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)नं शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. राज्य सरकारने यासाठी जोर लावला होता. आता हा निर्णय आल्याने बैलगाडा चालक, मालक, शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. याचा पाठपुरावा करणारे शिवाजीराव अढळराव पाटील, अमोल कोल्हे यांसह राज्य सरकारमधील विविध मंत्री यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जी सशर्त परवानगी दिली आहे, त्या नियमांचे पालन होईल, अशी ग्वाहीही देण्यात येत आहे.
