Ajit Pawar : मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर, उपमुख्यमंत्री तर बिन खात्याचेच..!

Ajit Pawar : मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर, उपमुख्यमंत्री तर बिन खात्याचेच..!

| Updated on: Aug 06, 2022 | 7:29 PM

मंत्रिमंडळाचे सोडा राज्याचे उपमुख्यमंत्री हे देखील बिन खात्याचे आहेत. त्यामुळे राज्याचा कारभार बेभरवश्याचा सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्याचे मंत्रिमंडळ केवळ एकाच मंत्र्यावर सुरु आहे. महिन्यापासून हीच अवस्था आहे. असे असतानाही खाते वाटप झाले नाही. त्यामुळे हे असून नसल्यासारखे आहे असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

मुंबई : दिवसेंदिवस मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत आहे.त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच विस्तार होणार असल्याचे दिल्लीत दाखल झाल्यावर सांगितले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आरोप हे सुरुच आहे. राज्यातील अनेक प्रश्न रखडलेले आहेत. असे असताना केवळ मंत्रिमंडळाचा प्रश्न मार्गी लावता आलेला नाही. मंत्रिमंडळाचे सोडा राज्याचे उपमुख्यमंत्री हे देखील बिन खात्याचे आहेत. त्यामुळे राज्याचा कारभार बेभरवश्याचा सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्याचे मंत्रिमंडळ केवळ एकाच मंत्र्यावर सुरु आहे. महिन्यापासून हीच अवस्था आहे. असे असतानाही खाते वाटप झाले नाही. त्यामुळे हे असून नसल्यासारखे आहे असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

Published on: Aug 06, 2022 07:29 PM