India’s First Electric Engine Video : CSTM स्थानकाचं नुतनीकरण पण ‘मरे’चं दुर्लक्ष, देशातील पहिलं इलेक्ट्रिक इंजिन पडलं धूळखात

India’s First Electric Engine Video : CSTM स्थानकाचं नुतनीकरण पण ‘मरे’चं दुर्लक्ष, देशातील पहिलं इलेक्ट्रिक इंजिन पडलं धूळखात

| Updated on: Jan 31, 2025 | 1:12 PM

२०१८ पासून देशातील पहिलं इलेक्ट्रिक इंजिन हे सीएसएमटी स्थानकावर पडून असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून सीएसएमटी स्थानकावर नूतनीकरणाचं काम सुरू असताना मध्य रेल्वेचं या हेरिटेज इलेक्ट्रिक इंजिनकडे दुर्लक्ष कसं झालं?

मुंबईतील मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी स्थानकावर देशातील पहिलं इलेक्ट्रिक इंजिन धूळखात पडल्याचं समोर आलं आहे. २०१८ पासून देशातील पहिलं इलेक्ट्रिक इंजिन हे सीएसएमटी स्थानकावर पडून असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून सीएसएमटी स्थानकावर नूतनीकरणाचं काम सुरू असताना मध्य रेल्वेचं या हेरिटेज इलेक्ट्रिक इंजिनकडे दुर्लक्ष कसं झालं? यावर आता सवाल केले जात आहे. सीएसएमटीला जागतिक दर्जाचे रेल्वे केंद्रात रुपांतरित करण्यासाठी, त्याचा पुनर्विकास केला जात असताना भारतातील अगदी पहिल्या रेल्वेपासून आतापर्यंत धावणाऱ्या रेल्वेच्या इतिहासातील एक ऐतिहासिक ठेवा सीएसएमटी येथे आहे. मात्र, त्याकडे रल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसतंय. देशातील पहिले विद्युत इंजिन, सर लेस्ली विल्सन इंजिन हे सध्या धूळखात पडल्याचे दिसून येत आहे. विमानतळाच्या धर्तीवर सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे. सीएसएमटी स्थानकाची ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फलाट क्रमांक १८ च्या बाजूला कॅफे टेरिया, स्थानकात प्रवाशांसाठी प्लाझा, रिटेल, करमणूकीच्या सुविधांसह खाद्य पदार्थांची दुकाने, विश्रामगृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Published on: Jan 31, 2025 01:12 PM