Jalgaon Rain | चाळीसगावावर पुन्हा नद्या कोपल्या, पुरामुळे अनेक घरात पाणी शिरलं

Jalgaon Rain | चाळीसगावावर पुन्हा नद्या कोपल्या, पुरामुळे अनेक घरात पाणी शिरलं

| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 8:49 AM

महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या चाळीसगाव शहरावर पुन्हा नद्या कोपल्या आहेत. चितूर डोंगरी नदीने पुन्हा उग्ररूप धारण केलं असून पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. शिवाजी घाट, आण्णाभाऊ साठे नगर, नगर भिल्ल वस्ती, इच्छादेवी नगर,गवळीवाडा, हा भाग पूर्ण पाण्याखाली गेला आहे.

चाळीसगाव शहरावर पुन्हा नद्या कोपल्या

महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या चाळीसगाव शहरावर पुन्हा नद्या कोपल्या आहेत. चितूर डोंगरी नदीने पुन्हा उग्ररूप धारण केलं असून पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. शिवाजी घाट, आण्णाभाऊ साठे नगर, नगर भिल्ल वस्ती, इच्छादेवी नगर,गवळीवाडा, हा भाग पूर्ण पाण्याखाली गेला आहे. रात्री दोन वाजेपासून नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली शहरातील दोन्ही पुलांवरून प्रचंड वेगाने साधारण 8 फूट पाणी वाहत असल्याने जुन्या गावाशी नव्या गावांचा संपर्क तुटला आहे. आता पुराचे पाणी काहीसं ओसरु लागलं असून या सगळया पावसाने नागरिकांचं मोठं नुकसान झालंय.