Devendra Fadnavis यांच्या वक्तव्यावर Chandrakant Khaire यांचं प्रत्युत्तर
महाविकास आघाडी सरकारसोबत MIM ने निवडणूक लढवायची तयारी दर्शवली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आज ढवळून निघत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज्यातील राजकारणातील या नव्या समीकरणाचे सूतोवाच केले.
महाविकास आघाडी सरकारसोबत MIM ने निवडणूक लढवायची तयारी दर्शवली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आज ढवळून निघत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज्यातील राजकारणातील या नव्या समीकरणाचे सूतोवाच केले. मात्र भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचाच (Devendra Fadanvis) हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे, यामुळे शिवसेना आक्रमक होईल, महाविकास आघाडी तुटेल, असे त्यांचे मनसुबे आहेत. पण भाजपची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.
Published on: Mar 19, 2022 04:54 PM
