Chandrakant Khaire : ठाकरे बंधु भाजपाला उचलून फेकतील; चंद्रकांत खैरेंची मोठी प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर छत्रपती संभाजीनगरमधील कार्यकर्त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात एकीकडे राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचा गड समजला जाणाऱ्या संभाजीनगर येथील अत्यंत जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांना देखील ठाकरे बंधु एकत्र आले पाहिजे अशी इच्छा असल्याचं म्हंटलं आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी याबद्दल बोलताना म्हंटलं की, उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आलेच पाहिजे. ठाकरे बंधु एकत्र आले तर, भाजपाला उचलून फेकतील. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद असल्याने आता जे झालं त्याला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे, असं उत्तर खैरे यांनी सांगितलं. त्याचबरोबर संभाजीनगरमधील इतर कार्यकर्त्यांनी देखील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर सकारात्मक प्रतिसाद देत ठाकरेंच्या एकत्र येण्याची वाट बघत असल्याचं म्हंटलं आहे.
Published on: Jun 08, 2025 03:07 PM
