काहीजण फक्त सोशल मीडियावर वाचतात, माझी बायकोही तशीच- चंद्रकांत पाटील

काहीजण फक्त सोशल मीडियावर वाचतात, माझी बायकोही तशीच- चंद्रकांत पाटील

| Updated on: Oct 15, 2022 | 2:37 PM

मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानं कायम चर्चेचा विषय ठरतात. आताही त्यांनी आवांतर वाचनावर भाष्य केलंय. ज्याची सध्या जोरदार चर्चा होतेय.

अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानं कायम चर्चेचा विषय ठरतात. आताही त्यांनी अवांतर वाचनावर भाष्य केलंय. त्यावर भाष्य करताना त्यांनी आपल्या पत्नीचं (Chandrakant Patil Wife) उदाहरण दिलं. मला वाचनाची खूप आवड आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरची सगळी पुस्तक वाचली आहेत. त्यासोबतच सावरकरांवर आधारित सगळी पुस्तक मी वाचली आहेत. अनेकांना वाचनाचा कंटाळा असतो.सोशल मीडियावर सगळं काही मिळतं असा समज करून हे लोक पुस्तकांना बगल देतात आणि सोशल मीडियावरच वाचतात. माझी बायकोही तशीच आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिथून अपडेट घेते आणि मला ब्रीफ करते. ती मला सांगते तुला कुठं जायचं असेल ते मला सांग. मी तुला ब्रीफ करते, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत. पुणे विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन आणि मुक्त संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

Published on: Oct 15, 2022 12:28 PM