‘भाजपकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे हे पवारांनीही केलं मान्य’, चंद्रकांत पाटील यांचा टोला

| Updated on: Mar 18, 2022 | 3:40 PM

कोल्हापुरात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर जोरदार शरसंधान साधलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्याला उत्तर देताना, युद्ध सुरू होईल तेव्हा बघू, असे पाटील म्हणाले आहेत.

Follow us on

कोल्हापुरात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर जोरदार शरसंधान साधलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्याला उत्तर देताना, युद्ध सुरू होईल तेव्हा बघू, असे पाटील म्हणाले आहेत. तर भाजप कडून काहीतरी शिका असा सल्लाही त्यांनी आमदारांना दिलाय. भाजप कडून काही शिकण्यासारखे आहे हे पवार साहेबांनी सुद्धा मान्य केलं, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. तसेच राजू शेट्टी यांच्याबाबत बोलताना, भाजपची काही ध्येय धोरणं राजू शेट्टींना पटली नव्हती, त्यावर चर्चा करू पण मोदींवर टीका करू नका अशी विनंती केली होती. पण ते बाहेर पडले. आता महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी सोडली आणि भाजपसोबत येण्याचा विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असेही ते म्हणाले आहेत.