Chhagan Bhujbal : वाल्मिक कराडवरून भुजबळ – जरांगे आमनेसामने
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाव न घेता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना वाल्मिक कराडच्या मुद्द्यावरून सल्ला दिला आहे.
वाल्मिक कराडने हत्या केलेल्या असतील तर पोलिसांना सांगा, स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी हवेत वक्तव्य करू नका, असा टोला लगावत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काउंटर करण्याच्या बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याच्या दाव्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी वाल्मिक कराडने अनेक हत्या करून लोकांना संपवलं, खंडण्या मागितल्या, आता आपलं काम झालं आता याची गरज नाही असं वाटलं असेल त्यामुळे धनंजय मुंडे यांना कराडला संपवायचं असेल, असा आरोप केला आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. कराडने हत्या केल्या असतील तर त्यांची नावं, गाव, इतर माहिती पोलिसांना द्या, उगच स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी हवेत वक्तव्य कशाला करता, असा नाव न घेता भुजबळांनी जरांगे यांना टोला लगावला आहे.
Published on: Apr 21, 2025 08:59 AM
