Chhagan Bhujbal : विखे आला अन् महाराष्ट्रात विखार…सोडणार नाही, एक दिवस असा येईल… भुजबळांचा इशारा

Chhagan Bhujbal : विखे आला अन् महाराष्ट्रात विखार…सोडणार नाही, एक दिवस असा येईल… भुजबळांचा इशारा

| Updated on: Oct 18, 2025 | 12:00 PM

छगन भुजबळ यांनी राधाकृष्ण विखे-पाटलांवर महाराष्ट्रात विखार पसरवल्याचा आरोप करत गंभीर इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवरील टीकेलाही प्रत्युत्तर दिले. सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा भुजबळांचा दावा आहे.

छगन भुजबळ यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर महाराष्ट्रात विखार पसरवल्याचा गंभीर आरोप केला आहे. जरांगे-पाटील यांच्याशी वारंवार भेटीगाठी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही, असा इशारा भुजबळांनी दिला.  काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांना त्यांनी डबल ढोलकी म्हटले. भुजबळांनी सत्ताधारी भाजपचा बचाव करत, पक्षाचे सरकार जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी काम करत असल्याचे सांगितले. ओबीसी समाजाच्या ताकदीवर भाजपला मिळालेल्या आमदारांची आठवण करून देत, ओबीसींवर अन्याय झाल्यास शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही भुजबळांनी केला.

Published on: Oct 18, 2025 11:59 AM