छत्रपती संभाजी राजे यांना तिकीट देण्यास महाविकास आघाडी तयार, पण अट काय?
महाविकास आघाडीतील ठाकरे गट, काँग्रेस किंवा शरद पवार गट या तीन पक्षांपैकी एका पक्षात जर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रवेश केला तर संभाजीराजे यांची उमेदवारी निश्चित असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यासंदर्भात कोणती भूमिका घेणार?
मुंबई, १ फेब्रुवारी २०२४ : महाविकास आघाडीमध्ये आल्यास छत्रपती संभाजीराजे यांना आगामी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गट, काँग्रेस किंवा शरद पवार गट या तीन पक्षांपैकी एका पक्षात जर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रवेश केला तर संभाजीराजे यांची उमेदवारी निश्चित असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यासंदर्भात कोणती भूमिका घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या जागावाटपावेळीही महाविकास आघाडीमध्ये मतभेद होणार असल्याचे वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी असं वक्तव्य करत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. बघा नेमकं काय म्हणाले मंत्री शंभूराज देसाई ?
Published on: Feb 01, 2024 05:56 PM
