Sambhajinagar News : संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल

Sambhajinagar News : संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल

| Updated on: Mar 18, 2025 | 7:01 PM

Aurangzeb Tomb Controversy : औरंगजेबाची कबर काढण्याचा मुद्दा आता चिघळला असून कबरीजवळ कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या संपूर्ण परिसराची पाहणी आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलिस अधिक्षकांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ही कबर काढून टाकण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीला आता हिंसक वळण देखील लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. याच संदर्भात आज पाहणी करण्यासाठी संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक खुलताबाद येथे या कबर असलेल्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

Published on: Mar 18, 2025 07:01 PM