Sambhajinagar News : औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला

Sambhajinagar News : औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला

| Updated on: Mar 16, 2025 | 3:04 PM

Aurangzeb Kabar News : उद्या विश्व हिंदू परिषदेकडून औरंगजेबाची कबर काढण्यात यावी म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरी जवळ कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरी जवळ पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. फक्त एक व्यक्ती प्रवेश करू शकेल अशा बॅरिगेट्स याठिकाणी पोलिसांनी लावल्या आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुख्य दरवाजा देखील आज पोलिसांनी बंद केलेला आहे.

संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर काढून टाकण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना आणि नितेश राणे यांच्याकडून केली जात आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे याठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला बघायला मिळत आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुख्य दरवाजा पोलिसांनी बंद केला असून फक्त एक व्यक्ती प्रवेश करू शकेल अशा बॅरिगेट्स या परिसरात लावण्यात आलेल्या आहेत. उद्या विश्व हिंदू परिषदेकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने खबरदारी म्हणून देखील बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

Published on: Mar 16, 2025 03:04 PM