त्यांनी पाप केलं, आम्ही प्रभू रामाचा आशीर्वादासाठी आलोय; शिवसेना नेत्याची राऊतांवर टीका

त्यांनी पाप केलं, आम्ही प्रभू रामाचा आशीर्वादासाठी आलोय; शिवसेना नेत्याची राऊतांवर टीका

| Updated on: Apr 09, 2023 | 12:27 PM

एकनाथ शिंदेंना आम्हीच याआधी अयोध्येला घेऊन गेलो होतो. अयोध्येत जाणे हा एक आनंद असतो, पण प्रभू श्रीरामाचे सत्यवचन तुम्ही कुठून घेणार? असा सवाल राऊत यांनी केला

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यासह आमदार आणि खासदारांवर अयोध्या दौऱ्यावरून टीका होत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार करताना, त्यांनी पाप केलं. आम्ही प्रभू रामचंद्र यांचा आशीर्वाद घ्यायला आलोय. कारण प्रभू रामचंद्रांनीच हिंदुत्व आणि वंदनी बाळासाहेबांचा विचार जपणारे एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्य सोपवलं आहे. त्याच्यामुळे आम्ही भावनिक बाब म्हणून बघतो. ज्यांना कोणाला टीका करायची ते करू द्या. पण मागच्या दोन दौऱ्याचा मी स्वतः साक्षीदार आहे, किती लोक कोणाला भेटले? काय दौरा झाला? कशा पद्धतीने दौरा झाला? कोणी कोणाला भेटत नव्हतं. कोण कोणाशी बोलत नव्हतं. ते फक्त राजकीय आम्ही हिंदुत्व पाळत आहेत. महाविकास आघाडीमध्ये असताना हिंदुत्व फक्त दाखवण्यासाठी होतं असा टोला लगावला आहे. एकनाथ शिंदेंना आम्हीच याआधी अयोध्येला घेऊन गेलो होतो. अयोध्येत जाणे हा एक आनंद असतो, पण प्रभू श्रीरामाचे सत्यवचन तुम्ही कुठून घेणार? असा सवाल राऊत यांनी केला. तेच हे सगळं ढोंग असून प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद याना अजिबात मिळणार नाही असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला होता.

Published on: Apr 09, 2023 12:27 PM