औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यात शिक्षणासाठी मुलांचा जीवघेणा प्रवास, प्रशासनाचं दुर्लक्ष

| Updated on: Nov 23, 2022 | 1:52 PM

औरंगाबादमधील भीव धानोरा गावातील मुलांचा शिक्षणासाठी जायकवाडी धरणातून जीवघेणा प्रवास.

Follow us on

Aurangabad : औरंगाबादमधील भीव धानोरा गावातील मुलांना शिक्षणासाठी जायकवाडी धरणातून (Jayakwadi dam) प्रवास करावा लागत आहे. मुलांना छोट्या थर्माकॉलच्या तराफ्यावर धक्कादायक प्रवास करावा लागत आहे. मुलांना शाळेत जाण्यासाठी एकूण 4 किलो मीटरचा रस्ता आहे. त्यामध्ये एक किलो मीटरचा रस्ता हा या धरणातून पार करावा लागतो. आई-वडिलांनी बनवून दिलेल्या थर्माकॉलच्या तराफ्यावर ही लहान मुले प्रवास करत असल्याचं आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मुलं अशा प्रकारचा जीवघेणा प्रवास करत आहेत. मात्र अजून देखील प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही.