25 वर्ष फक्त भाषणंच! ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? चित्रा वाघ यांचा घणाघात
ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. गेली 25 वर्ष फक्त भाषणं केली, या व्यतिरिक्त दुसरं काही जमलं नाही असा टोला वाघ यांनी लगावला आहे. मुंबईतील पागडी इमारतीमध्ये मराठी माणूस पिढ्यानुपिढ्या अडकून पडला आणि माणसं मेली पण मराठी म्हणून छाती बडवणाऱ्या ठाकरेंनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं?
एकीकडे महानगरपालिका निवडणूकीसाठी सर्वच पक्षांकडून कंबर कसून प्रचार सुरू आहे, तर इकडे भाजप नेत्या चित्रा वाघ या ठाकरे बंधुंवर चांगल्याच बरसल्यात. ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. गेली 25 वर्ष फक्त भाषणं केली, या व्यतिरिक्त दुसरं काही जमलं नाही असा टोला वाघ यांनी लगावला आहे. मुंबईतील पागडी इमारतीमध्ये मराठी माणूस पिढ्यानुपिढ्या अडकून पडला आणि माणसं मेली पण मराठी म्हणून छाती बडवणाऱ्या ठाकरेंनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय मराठी माणसाच्या घरासाठी कोणतेच निर्णय आजपर्यंत घेता आले नाही, असं देखील वाघ म्हणाल्या.
याउलट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर यांच्यावर भाष्य करत चित्रा वाघ यांनी त्यांची चांगलीच पाठ थोपटली आहे. राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि पागडी सिस्टीममध्ये अडकलेल्या मराठी माणसाला दिलासा मिळाला. हाच खरा फरक आहे वाचाळवीर आणि विकास पुरूष यांच्यामधला, असं म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरेंना चांगलाच खोचक टोला लगावला आहे.
