Chitra Wagh : वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्याच – चित्रा वाघ
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर भाजपच्या चित्र वाघ यांनी प्रतिक्रिया दिलेली असून तिची हत्याच झाली असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
वैष्णवी हगवणेची आत्महत्या नाही तर हत्याच आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे. राजेंद्र हगवणे कोणत्याही पक्षाचा असला तरी वैष्णवीला न्याय मिळवून देणारच असंही वाघ यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हुंड्याच्या छळातून तिची हत्या करण्यात आलेली असल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबावर केलेला आहे. दरम्यान, या प्रकरणी चित्रा वाघ यांनी आता प्रतिक्रिया दिली असून वैष्णवीला ज्या प्रकारे त्रास दिला गेला त्यावरून ही हत्याच असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. पैशांसाठी मुलीला एवढा त्रास देणं हे अमानवी आहे. राजेंद्र हगवणे कोणत्याही पक्षाचा असला तरी वैष्णवीला न्याय मिळवून देणारच असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
Published on: May 22, 2025 12:15 AM
